"लहान मुलांचा आहार " व्याख्यान :- स्थळः-श्री गुरुमैया प्रभाकंवरजी शिशुविहार व प्राथमिक विद्या मंदिर, चिंचवड पुणे ।
व्याख्यान देण्याची संधी जेव्हा येते तेव्हा ती नेहमीच माझ्यासाठी एक अभ्यासपुर्ण संशोधनात्मक तसेच सकारात्मक उर्जा असते।।
तसे हे माझे 142 वे व्याख्यान
स्थळ:- श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचालित
श्री गुरुमैया प्रभाकंवरजी शिशुविहार व प्राथमिक विद्या मंदिर, चिंचवड पुणे ।
मुख्याध्यापक:- श्री जयप्रकाश दहिफळे सर,
विभाग प्रमुख:-
तसेच ज्यांच्यामुळे शाळेला भेट देण्याचा योग आला अशा सौ रेखा पितळीया मैडम यांचे भरपुर आभार।।
सुत्रसंचालन:- सुंदर मांडणी व प्रस्तावना:- सौ अनुजा आगम मॅडम
तसेच सर्व सहकारी शिक्षक वृंद यांचे आभार ।।
मन प्रसन्न करणारी जागा तसेच मोठे पटांगण तसेच शाळेच्या आवारात सुंदर बाग (नावासहीत) तसेच शाळे मागे शाळेची शेती तेथील शेवगा, अडुळसा ची झाडे तसेच सतत नविन उपक्रम
त्यातील एक उपक्रम ":- लहान मुलांचा आहार" यांवर माझे व्याख्यान।
जवळ जवळ 100 मुले फक्त 3 ते 4 थी वर्ग व त्या ही पेक्षा जास्त पटसंख्या ।
काही मुद्दे व्याखानातील:-
मुलांनी सकाळ पासुन ते रात्री पर्यत काय खावे ।
कसा अभ्यास करावा।
कधी खेळावे।
पावसाळ्यात , हिवाळ्यात व उन्हाळ्यात काय खावे।
लहान मुलांची दिनचर्या, त्यांना होणारे आजार, तसेच काय खावे व कांत खावे नये।
झोप किती महत्वाची असते ।
आ णि शेवटी मेमरी प्रश्नमंजूषा ने तर मुलांनी मला जिंकलेचकी।।
मित्रांनो अशाच मराठी शाळा व सेमी इग्लिश शाळा वाढाव्यात,
सुंदर पांठातर, सुंदर हस्ताक्षर, शिस्त व नाविण्यता, उपक्रमाद्वारे शिक्षण हेच खरे शिक्षण।
शेती काय, बागकाम काय, प्रोजेक्ट प्रिपरेशन काय आहे प्रत्यक्ष पाहता येते हा किती छान अनुभव ।।
पटसंख्या हाऊसफुल ।।
जातांना मुले म्हणाली बाय सर , आम्हाला फार आवडले।
आता आम्ही वाढदिवसाला चोकलेट नाही तर फळ खाणार।
धन्यवाद व भरपुर आभार।
डॉ सचिन मारुती भोर एम डी आयुर्वेद
संचालक
सुलभास् श्री साईनाथ आयुर्वेदिक आर्थो केअर व फर्टिलीटी क्लिनिक, रावेत, पुणे।
Comments
Post a Comment