Journey of satishfaction
एक #अळुवडी अशीही...!! रुग्नाला चिकित्सा करतांना मी नेहमीच दरवेळी पुर्ण मेहनतीने प्रयत्न करतो... दरवेळी नविन संधी व नव्याने शिकायला मिळते.. ह्या 7 जुलैला 18 वर्ष पुर्ण होतील..पण दरदिवशी असे वाटते की आजच सुरुवात करतोय... ठाणे येथे आयुर्वेदिक ओपिडीला ह्या वर्षी 18 वर्ष पुर्ण झाले.. रुग्नांनी मला नेहमीच भरभरुन प्रेम दिले.. माझ्यावर विश्वास ठेवला व मी सुध्दा पुर्ण न्याय द्यायचा नेहमीच प्रयत्न करत असतो.. आजही ..पाटील सर ठाणे.पक्षाघाताने त्रस्त झाले होते ,एकाच जागेवर खिळुन होते..गेले 2 महिने माझी टिम त्यांच्यावर काम करतेय.. स्नेहन,स्वेदन ,बस्ती ,शिरोधारा,नस्य हे सर्व कर्म उत्तम रित्या करताय..तसेच रोज त्यांचा व्यायाम घेताय.. आणि आज त्यांना तपासण्यासाठी त्यांच्या घरी गेलो असता..त्यांनी स्वतः दरवाजा उघडला..चालत माझ्याकडे आले.. हे माझ्या टिमची मैहनत आहे.. विशेष करुन Manoj Gupta माझा ठाणे येथील थेरपिस्ट.. मी तुमचा आभारी आहे आणि आज पाटील मॅडम माऊलीने माझ्यासाठी व माझे सहकारी डॉ निखिल साठी अळुची वडी व मोदक दिले... मॅडम,परतीला लोणावळ्यामध्ये विसावा जेव्हा घेतला तेव्...