Bhakti, Dnyana and Vairagya

सुप्रभात 
कलयुगात 
भक्ती,ज्ञान व वैराग्य हे निद्रावस्थेत आहेत..
कुठल्याही गोष्टी प्राप्त करण्याची भक्ती आसक्ती लोकांमध्ये राहीली नाही..सातत्य नाही ,आळशीपणाच्या महामेरुने शरीरावर व मनावर आवरण करुन जीवन आहे तसेच जगणे ..ह्यात कुठलाही बदल वा नियोजन किंवा आयुष्याचे ध्येय नको..फक्त निद्रा व आळस असा कलयुगी मनुष्य..
2.ज्ञान : अज्ञानाचा मोह लोभनीय असल्याने ज्ञान मार्गच लोप पावत आहे..
अज्ञानाने कितीही प्रबोधन केले तरीही ज्ञानाचे मार्ग खडतर आहे परंतु तुमच्या सोबतील नेहमी सत्य आहे ह्याची जाणीव असु द्यावे
परंतु अज्ञानाने डुक्कर जसा चिखलात लोलुप होतो तसाच मनुष्य कलयुगात लोलुप होत आहे...

3.वैराग्य : कलयुगात वैराग्य तर नाश पावत आहे कारण त्याग कोणालाच नको आहे . .प्रत्येक जड होणारी वस्तु फेकुन देणे मग आई वडील च का असेना हेच काय ते वैराग्य कलयुगात प्राप्त झाले आहे ,खरे वैराग्य डोळे झाकुन निद्रिस्त आहे..
तर मग केवळ आपल्या अंतरात्मातील  मनाला आपणास मिळालेले शरीर व मन हे किती सुंदर आहे हे समजुन घ्या..
प्रथमत ऐकायला शिकणे आवश्यक आहे, भक्ती ही निर्विकारतेने प्राप्त होते..जेथे आपल्या कामात निस्सिम भक्ती हवी ,ते काम सर्वाथाने आज तुम्ही 100% केले का?
तुम्ही तुमच्या कामात कुशल आहात का?
नसाल तर उद्या कशाला आजच प्रयत्न करा व स्वतः ला तुमच्या कामात परिपुर्ण करा.

ज्ञान जमजण्या अगोदर अज्ञान समजुन घेणे आवश्यक आहे 
कामातील चुका, तुमचे आवडते शत्रु तसेच तुम्हाला तुमचे कार्यापासुन रोखणारे तुमचे व्यासंग, आळस व काही मनुष्य ह्यांना ओळखा,अज्ञान ओळखा व  दुर ठेवा व त्यानंतर ज्ञानाचे द्वार उघडतील सत्य समोर येईल.
वैराग्य साठी स्वतः वर विश्वास हवा 
तुम्ही ते करु शकता,तसेच जगात अशक्य असे काहीच नाही हे समजुन घ्या..प्रयत्नाला सातत्याची कास मिळाली की मग यशाची ना मजा असते व ना ही दुख..
एक निश्चल तरल भाव उत्पन्न होतो तो च खरा वैराग्य त्यात मी पणाचा अहंकार नसतो व नाही अपयशाचे दुख ..साथ असते ती एकच..की

मला हे समजणार आहे
मी हे करु शकतो
मी हे आजच करणार आहे
मी काम आत्ताच करणार आहे 
मग ते काम असो वा नाती असो वा रोजच्या दिवसाची रोजनिशी असो..

आत्ताच ते होणे आवश्यक आहे..
तर मग
भक्ती ,ज्ञान व वैराग्य त्रिकुट नेहमी सोबत असु द्यावे ..त्याने जगात अशक्य असे काहीच नाही...!!!

ज्ञानाला लपवण्यासाठी अज्ञानाला लोक पसरवतील ,लोभस भाव देतील पण सत्य , ज्ञानाची कास धरा..

आजचा दिवस शुभ जावो..

वै.सचिन मा.भोर

Comments

Popular posts from this blog

Journey of satishfaction

Profile:- Dr.Sachin M.Bhor and Sulbhas Shree Sainath Ayurved & Panchkarma Clinic Ravet Pune.

"लहान मुलांचा आहार " व्याख्यान :- स्थळः-श्री गुरुमैया प्रभाकंवरजी शिशुविहार व प्राथमिक विद्या मंदिर, चिंचवड पुणे ।