वजन कमी करा व विष घ्या...
#वजन_कमी करा व #हेल्थ ड्रिंक घ्या..नाही खरतर #विष घ्या..
मित्रांनो सध्या ह्या व अशा अनेक हेल्थ ड्रिंक सध्या मार्केट मध्ये येत आहेत ..ज्यात सकाळी व्यायाम करुन हे हेल्थ ड्रिंक पिण्यास दिले जाते.
खरतर ..हे हेल्थ साठी दिलेले हेल्थ ड्रिंक मध्ये कुठले घटक द्रव्ये आहेत ह्याबद्दल काहीही माहीती पिणार्यास व विकण्यार्यास नसते..
ते फक्त म्हणतात की हे आयुर्वेदिक आहे..
असेच
#केस नं 1 एक मुलगा वय 30 व वजन 100 किलो.
माझ्याकडे ह्या हेल्थ ड्रिंक संबधात माहीतीसाठी आले..पण डब्यावर फक्त प्रोटिन ,कार्बोहायड्रेट व एनर्जी हेच लिहलेले होते व FDA द्वारे सप्लिंमेट म्हणुन लिहले होते..
परंतु प्रश्न हा आहे की ह्यात आहे काय ?
ते माहीत नाही...
तर मग मी त्यास सांगीतले की
आयुर्वेदिक कुठलेही वजन कमी करण्याचे औषध वैद्यांच्या सल्ल्यानेच घे कारण प्रकृती नुसार व तुझ्या शरीरातील दोष धातु व मल यांच्या स्थितीनुसार औषधात ; व्यायामात बदल करावा लागतो..
सरसकट एकच औषध सगळ्यांना देता येत नाही कारण ते औषध आहे..मंदिरातील प्रसाद नाही , सरसकट सर्वांना द्यायला..
जर ते वजन कमी करते म्हणजे ते औषध आहे..
त्या औषधाला कान नाहीत म्हणजे मी त्या औषधाला सांगेल की
मित्रा ह्रदय, मेंदु , संधी , फुफ्फुसे व मणक्या मधील मेंद अंश कमी करु नको फक्त शरीराला चिटकलेले मेदच कमी कर
पण तसे काही #कान औषधाला नाही पण तुझ्या हेल्थ ड्रिंकला तसे कान आहेत का?
म्हणजे तु रोज सकाळी हे पिणार ?
तुझे वजन कमी होनार?
व हे किती दिवस घेनार?
बाकी सदर मुलाचे वजन 20 किलो त्या हेल्थ ड्रिंक ने कमी झाले व अजुनही तो ते घेत होता..रोज सकाळी व्यायाम व हेल्थ ड्रिंक
पण आता जरा परिस्थिती वेगळी होती..
त्याचे दोन्ही खुबे ( Ball and socket joint ) at femoral head shows necrosis with #AVN.
त्याला चालता येत नव्हते...
का तर त्याला माहीत नाही..
इतिहास : सहा महिन्यापासुन हे हेल्थ ड्रिंक रोज चालु आहे
दुसरी केस
#केस नं 2 ठाणे
एक मध्यमवय स्री सुध्दा हेच काहीतरी घेवुन आल्यात ..त्याही जवळपास 80 किलो होत्या ..सहा महिन्यात त्यांचेही 10 किलो वजन कमी झाले पण नंतर दोन्ही गुडघे सुजले
Xray shows Osteoarthritis with degenerative changes.
#केस नं 3
स्री वय 45 पारनेर
1 वर्षापासुन सोरायसिस चा त्रास संपुर्ण अंगाला खाज व चट्टे
माझ्ता शिक्रापुर दवाखान्यात येवुन औषधे घेतली
थोडे बरे वाटले..नंतर पंचकर्म करण्यास सांगीतले
त्यानंतर त्यांनीही असेच काहीतरी सिरप व मलम घेतले ,1 महिन्यात सर्व चट्टे गायब.किंमय ही जवळपास 4000+
मला फोन करुन म्हटले ..आता एकदम बरे आहे..
6 -7 महिन्यांनी पुन्हा भेटले..म्हणाले सर त्या औषधांनी अंगाला व पायाला सुज येते..किडनी रिपोर्ट क्रिएटीन 4.5 वाढला..
हे व असे रुग्न वाढत आहेत..
आयुर्वेदिक औषधांचाही दुष्परिणाम शरीरावर होतो जर योग्य सल्ल्याने व योग्य डॉक्टराचा सल्ला घेतला नाही तर
जर तुम्ही आयुर्वेदिक च्या नावाने काही हेल्थ सप्लिमेंट घेत असाल तर त्यात काय आहे हे तुम्हाला समजणे आवश्यक आहे ..
नाहीतर चुकीच्या व्यक्तीकडुन चुकीच्या पध्दतीने घेतलेले औषध...हे औषध नसुन #विष आहे..
मग तुम्ही रोज काय पिताय...??
तुमची प्रकृती , नाडी , दोष , धातु, मल अवस्था तुमच्या वैद्याला विचारा..
आणि त्यानुसार कुठलेही आयुर्वेदिक औषधे घ्या..
तुम्ही जे हेल्थ ड्रिंक पिताय ते नक्की आयुर्वेदिक आहे का ?
त्यात काही केमिकल तर नाही? हे समजुन घ्या..
सावध व्हा..व सल्ल्यानेच औषधे घ्या..
"©"वै. सचिन मारुती भोर
Translation
Reduce weight and take #health drinks.. or better take toxic drinks..
Currently, many such health drinks are available in the market, where these health drinks are given to drink after exercising in the morning.
But.. What are the components in these health drinks given for health? There is no information available on this...
They just say it's Ayurvedic...
Similarly, #Case No. 1 A boy aged 30 and weighing 100 kilos.
I received information about this health drink.. But only protein, carbohydrates, and energy were mentioned on the label, which were written as supplements by the FDA..
But the question is, what's in it?
They don't know...
So then I will tell them that Take medicines prescribed by doctors to reduce weight, according to your nature and according to the condition of dosha, dhatus, and waste in your body; you need to change your exercise routine...
A single medicine doesn't work for everyone because it's medicine.. It's not temple offering, it's not meant for everyone...
If they help in reducing weight, then it's medicine..
If they have effect only on weight loss then I will tell them that Don't reduce the fats proportion of elements like Hridaya, kidney, Sandhi, lungs, and vertebra, just reduce the extra fat in the body.
Does it mean you drink it every morning?
Will your weight decrease?
And for how many days you going to take ?
The boy's weight was 20 kilos less with this health drink and he was still taking it with Morning exercise and health drink every day
But now the situation was different...
Both of his hip joints (Ball and socket joint) at the femoral head showed necrosis with #AVN.
He couldn't walk...
He Doesn'tknow anything about it.
History: This health drink has been in use daily for the past six months.
Second case
#Case No. 2 Thane
A middle-aged woman too came with something same drinks, She was also around 80 kilos.. She lost 10 kilos in six months but then both of her knees swelled
X-ray shows Osteoarthritis with degenerative changes.
#Case No. 3
Woman aged over 45
Suffering from psoriasis for a year, itching and scabs all over the body
She came to my Shikrapur clinic and took medicines
She felt a little better.. then she was advised to undergo Panchakarma
After that, she also took some drinks ,syrups and ointments, all the scabs disappeared in a month. Prize was around 4000+
She called me and said.. now she is completely fine..
After 6-7 months, she came back.. She said Sir, my body and feet swell because of these medicines.. Kidney report Creatinine increased to 4.5..
These and such patients are increasing..
Even Ayurvedic medicines have side effects on the body if not taken under proper guidance and without the advice of a qualified doctor
If you are taking any health supplements in the name of Ayurveda, then it is necessary for you to understand what is in it..
Otherwise, blindly taking medicines from anyone's hands... those medicines are just a poison..
So, what do you drink daily...?
Consult for your nature, pulse, dosha, dhatus, and mal condition with your doctor..
And take Ayurvedic medicines accordingly..
Is what you drink really Ayurvedic?
Are there any chemicals in it? Understand this..
Be careful.. and only take medicines as advised..
"©" Vd. Sachin Maruti Bhor"
.
Comments
Post a Comment