वजन कमी करा व विष घ्या...
#वजन_कमी करा व #हेल्थ ड्रिंक घ्या..नाही खरतर #विष घ्या.. मित्रांनो सध्या ह्या व अशा अनेक हेल्थ ड्रिंक सध्या मार्केट मध्ये येत आहेत ..ज्यात सकाळी व्यायाम करुन हे हेल्थ ड्रिंक पिण्यास दिले जाते. खरतर ..हे हेल्थ साठी दिलेले हेल्थ ड्रिंक मध्ये कुठले घटक द्रव्ये आहेत ह्याबद्दल काहीही माहीती पिणार्यास व विकण्यार्यास नसते.. ते फक्त म्हणतात की हे आयुर्वेदिक आहे.. असेच #केस नं 1 एक मुलगा वय 30 व वजन 100 किलो. माझ्याकडे ह्या हेल्थ ड्रिंक संबधात माहीतीसाठी आले..पण डब्यावर फक्त प्रोटिन ,कार्बोहायड्रेट व एनर्जी हेच लिहलेले होते व FDA द्वारे सप्लिंमेट म्हणुन लिहले होते.. परंतु प्रश्न हा आहे की ह्यात आहे काय ? ते माहीत नाही... तर मग मी त्यास सांगीतले की आयुर्वेदिक कुठलेही वजन कमी करण्याचे औषध वैद्यांच्या सल्ल्यानेच घे कारण प्रकृती नुसार व तुझ्या शरीरातील दोष धातु व मल यांच्या स्थितीनुसार औषधात ; व्यायामात बदल करावा लागतो.. सरसकट एकच औषध सगळ्यांना देता येत नाही कारण ते औषध आहे..मंदिरातील प्रसाद नाही , सरसकट सर्वांना द्यायला.. जर ते वजन कमी करते म्हणजे ते औषध आहे.. त्या औषधाला कान नाहीत म्हण...